शिक्षण- एम .ए ( मराठी ,इतिहास ) डी.एड, बी.एड ( हिंदी ,सामाजिक शास्त्र )
जन्म दिनांक-२१.१०.१९८०
पद- प्राथमिक शिक्षक
शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी , केंद्र उंबरे, तालुका -राहुरी जिल्हा -अहमदनगर.
एकूण सेवा – १५ वर्षे
पुरस्कार
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 2016 चा जिल्हा गुरूगौरव पुरस्कार
सहभाग आणि कार्य
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक .
ATM महाराष्ट्रच्या तीन राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सहभाग .
निशंक : सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे ,महाराष्ट्र राज्य सचिव.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ( बालभारती ) च्या इंग्रजी विषय सदस्य.
AINET च्या २०१६ च्या नागपूर येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सहभाग
AINET च्या २०१८ च्या मुंबई इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये पोस्टर प्रेझेन्टेशन
CCRT नवी दिल्ली येथे “Role of School in conservation of the Natural & Cultural Heritage” या प्रशिक्षनासाठी निवड .
CCRT गुवाहाटी येथील प्राथमिक शिक्षकांसाठीच्या ओरिन्टेशन कोर्स साठी निवड.
NCERT नवी दिल्लीच्या कला विभागात Master Trainer प्रशिक्षनासाठी निवड.
लेख ,कथा , शैक्षणिक लेख अनेक वृत्तपत्रे, शैक्षणिक मासिके यामधून प्रकाशित.
ATM अहमदनगरच्या ‘ज्ञानसूर्य’ या ई शैक्षणिक अंकामध्ये लेखन आणि संपादक म्हणून काम केले.
ATM च्या विविध जिल्हा शाखांच्या ई शैक्षणिक अंकांच्या निर्मिती प्रक्रियेत मदत.
राज्यस्तरीय महिला शिक्षिका साहित्य संमेलन उमरगा येथे कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान आणि कथा सादरीकरण.
मराठी समाज उत्तर प्रदेश आयोजित शिवजन्म भूमी शिवनेरी ते लखनऊ विद्यापीठ ,लखनऊ ह्या १६५१ किमी मोटार सायकल यात्रेत सक्रिय सहभाग.
रेडीओ सिटी वर शिवजयंतीच्या दिवशी विशेष मुलाखत प्रसारित .
अहमदनगर आकाशवाणी केंद्रावरून ‘अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित.
नाशिक जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित विशेष कार्यशाळेत ‘अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर विशेष मार्गदर्शन .
बालरक्षक म्हणून कार्यशाळेत मार्गदर्शन आणि विद्यार्थी गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न .
शाळेसाठी लाखो रुपयांचा लोकसहभाग उभा करण्यात मोलाची कामगिरी.
ई लर्निंग स्कूल, शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल
शाळेतील उपक्रम- बालसृष्टी या भीतीपत्रकातून विद्यार्थ्यांना कविता, कथा, चित्र लेखनासाठी प्रोत्साहन.
विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, निमित्ताने शाळेत वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करून मुलांना अभिव्यक्तीची संधी.
डॉ.अब्दुल कलाम तरंग वाचनालय शाळेत उभारून 300 पुस्तके उपलब्ध केली आहे.विद्यार्थी अवांतर वाचन करतात.
कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांच्या जयंती दिनाच्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिनाचे आयोजन .
शाळास्तरीय बालआंनद मेळाव्याचे दरवर्षी नियमित आयोजन.
विज्ञान दिन, संविधान दिन , प्रश्नमंजुषा , विद्यार्थी बँक ,विचारा तुम्ही सांगतो आम्ही , दुर्गुणांची होळी ,एक मूल एक झाड, क्षेत्रभेटी ,शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न.