
शिक्षण मंत्री आयोजित स्नेहभोजन
आज दिनांक 16 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.विनोदजी तावडे साहेब यांनी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी मागील काळातील चार शिक्षणमंत्री *मा.वसंत पुरके साहेब,मा.बाळासाहेब थोरात साहेब,मा.हसन मुश्रीफ साहेब स्वतः तावडे साहेब व विद्यमान शालेय शिक्षण मंत्री मा.आशीषजी शेलार साहेब,तसेच मा.प्राची साठे मॅडम कार्यासन अधिकारी शिक्षण मंत्री यांची उपस्थिती होती.*


त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण सचिव मा.वंदना कृष्णा मॅडम ,शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब , माजी शिक्षण सचिव नंदकुमार साहेब,शिक्षण संचालक माध्य.मा दिनकर पाटील, SSC बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे,माजी शिक्षण संचालक मा.सुनील मगर,गंगाधर म्हमाणे, सिद्धेश वाडकर,शिक्षणाधिकारी बी.बी चव्हाण,मीना शेंडकर,BEO अश्विनी सोनवणे,तसेच काही NGO प्रतिनिधी,मंत्रालयीन अधिकारी नानवटे साहेब, अंकुश बोबडे साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिकज्योती बेलवले, उपक्रमशील शिक्षक भरत काळे व विक्रम अडसूळ निमंत्रित केले होते.


यावेळी एकाच वेळी महाराष्ट्राला लाभलेले पाच शिक्षण मंत्री तसेच आजी माजी शिक्षण सचिव ,शिक्षण संचालक यांचे सोबत अनौपचारिक गप्पा झाल्या. यावेळी Active Teachers Maharashtra (ATM)च्या कामाचे कौतुक सर्वांनी करून भविष्यातही ATM ने राज्यासाठी दिशादर्शक काम करावे असे नवनियुक्त शिक्षण मंत्री यांनी आवाहन करून ATM टीम सोबत लवकरच चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित करू असे सांगितले.
