राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन एक समृद्ध प्रवास

मार्च 2015 रोजी लावलेला ATM म्हणजेच Active Teachers Maharshtra या WhatsApp समूहाचा वेलू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल असा कधी विचार ही केला नव्हता .ATM परिवारातील शिक्षक आणि शिक्षिका यांची साथ आणि विस्वासामुळे जीवन समृद्ध होत गेले.चार वर्षांत राज्यस्तरीय तीन संमेलने यशस्वीपणे पार पाडली. यातूनच नव नवीन संकल्पना सुचत गेल्या.भविष्यातील शिक्षण क्षेत्रातील विधायक कामासाठी एक संस्था उभी झाली याचा अभिमान वाटतो.
ATM चे स्वतःचे संकेतस्थळ निर्माण झाले ज्याचे विमोचन 10 फेब्रुवारी रोजी होत आहे.
शिक्षकांच्या लेखनाला चालना मिळावी म्हणून साहित्य संमेलनाची संकल्पना समोर आली आणि ATM परिवारातील शिक्षकांचा उत्साह आणि साथ यामुळे येत्या 10 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे
राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांनी माझ्यावर जो विस्वास् दाखवला आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न शेतपर्यंत माझ्याकडून केला जाईल.
या साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ.विशाल तायडे तर स्वागताध्यक्ष म्हणून ATM परिवार बांधणीत ज्यांची महत्वाची भूमिका आहे अश्या ठाणे येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ.ज्योती बेलवले यांची निवड केली आहे.

चला तर पुढे चालत राहूया
एकमेकांसोबत समृद्ध होत राहूया..

निमंत्रण पत्रिका
निमंत्रण पत्रिका