वाढदिवस अभिष्टचिंतन – ज्योती बेलवले

वाढदिवस अभिष्टचिंतन

ATM च्या स्थापनेपासून ,सर्व महत्वाच्या जडणघडणीत वाटा उचलणार्या म्हणण्यापेक्षा आपल्या या परिवाराला योग्य दिशा देणाऱ्या ,राजमार्ग दाखवणाऱ्या आपल्या सगळ्याच्या लाडक्या …..!! 

आपल्या अंगभूत कलागुणांचा वापर शाळेतील ,केंद्रातील नव्हे ATM च्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि आता NCERT च्या AIL वरील शिक्षक हस्तपुस्तिकेच्या माध्यमातून सगळ्या देशातील विद्यार्थ्यांसाठी करणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित कृतिशील शिक्षिका ……!! 

आपल्या ज्ञानाचा वापर संपूर्ण राज्यासाठी करणारी ,NCERT ,मुक्त विद्यालय आणि बालभारतीच्या अभ्यासक्रम निर्मिती मंडळाची अनुभवी सदस्या …… 

विद्यार्थी ,शाळा, समाज या बरोबरच आपल्या परिवाराची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पडणाऱ्या कुटुंबवत्सल कन्या ,पत्नी आणि आई असलेली आदर्श माता…..!! 

राष्ट्रपती आदर्श शिक्षिका पुरस्कारापेक्षा ,त्या पुरस्काराने सासऱ्यांच्या डोळ्यात उभ्या राहिलेल्या आनंदाश्रू ना अधिक मोल देणारी आणि त्याचा अभिमान बाळगणारी कुटुंबवत्सल सून ……!! 

विद्यार्थी विकास हे ध्येय घेऊन सातत्याने नवनवीन प्रयोग ,उपक्रम आपल्या शाळेत राबविणारी जिच्या बाबतीत ‘उपक्रमाची खाण’ ही पदवी तंतोतंत लागू पडते अशी धडपडी शिक्षिका….!! 

अत्यंत हुशार,सुस्वभावी ,सुंदर ,लाघवी स्वभावाची , चाणाक्ष,प्रसिद्धीपरांमुख , प्रसंगोत्पात नर्मविनोदी शैलीची दैवी देणगी असलेली ,मितभाषी स्वभावाची ,आम्हा भावंडांसाठीची सुग्रण असणारी दिलदार ताई….!! 

विज्ञानाची पदवीधर शिक्षिका, मराठीची जाणकार भाषातज्ञ, 1 ली ते 8 वी च्या कवितांना चाल लावून सुंदर आवाजात गाणारी सुस्वर गायिका ,कला कार्यानुभवची उत्तम जाण असणारी आणि त्याचा विद्यार्थी विकासासाठी सातत्याने उपयोग करणारी आदर्श शिक्षिका….!! 

सौ ज्योतीताई दीपक बेलवले
जि प प्रा शा केवणीदिवे ,ता भिवंडी 

अशा कित्येक उपमा ,अलंकार आणि विशेषणांनी नटलेल्या ज्योतीताई काय काय नाहीये ? असा जर प्रश्न विचारलं तर याच उत्तर एकंच आहे आणि ते म्हणजे ज्योतीताई सगळं काही आहे …..!! ज्यांच्या बाबतीत ‘बस नाम ही काफी है …!!’ किंवा ‘सब कुछ ज्योतीताई’ असं म्हणता येतं अशा महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजे ज्योतीताई …..!!आता या क्षणाला शाळा ,विद्यार्थी ,उपक्रम या संदर्भातील कुठलीही अडचण तुम्ही ताई जवळ मंडलीत तर ती काही मिनिटात सुटली म्हणून समजा इतकं वाहून घेतलेल आहे ताई ने शाळा आणि विद्यार्थी विकासासाठी . आजूबाजूला पहात असतांना प्रत्येक गोष्टीत ताईला विद्यार्थी विकासासाठीचे शैक्षणिक साहित्य दिसत असतं . 

या बाबतीत ज्योती ताईंची नजर कमालीची कलात्मक आहे ,मागे आम्ही दिल्लीला गेलो होतो NCERT च्या प्रशिक्षणासाठी तर तेव्हा आम्ही एक दिवस आधी गेल्याने आग्रा ,मथुरा ,वृंदावनला फिरायला गेलो असतांनाचा प्रसंग मला नेहमीच आठवत राहतो ,दिवस भर फिरून परत येत असताना मथुरेत आम्हाला कृष्ण मंदिराच्या तिथे बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर वाहिलेले हार बाजूला काढून ठेवलेले दिसले ,ताईने लगेच ये हार आपल्या पिशवीत भरून घ्यायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी त्याच हारातील फुले आणि पाने यांच्या वापराने हॉलच्या दारात आम्ही सुंदर अशी रांगोळी काढली होती .पवन मॅडम आणि NCERT चे संचालक ते पाहून खूप खुश झाले होते. त्याच जवळजवळ सगळं श्रेय ज्योतीताईंचे …..!! 

असेच आणखी एक उदाहरण त्यांनी स्वतः सांगितले ,नाशिक समूहाने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता तेव्हा त्यांनी ट्रॉफी बरोबर बुके सुद्धा दिला होता ,मग मी म्हणालो की ताई तुमच्याकडे बरेच बुके जमा झाले असतील नाही का , त्यावर त्या म्हणाल्या की भरपूर मिळाले आणि मी त्यातली फुले वाळल्या नंतर त्याच्या साच्या पासून माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तरंगते शैक्षणिक साहित्य बनवले आहे ,मी म्हणालो आरे वाह ….! तर त्या म्हणाल्या की आता तर माझ्या विद्यार्थ्यांनाही माहीत झालं आहे की प्रत्येक टाकाऊ वस्तू पासून काही तरी साहित्य बनवता येईल म्हणून ते ही कुठलीच वस्तू फेकून न देता शाळेत आणतात …..!! किती हा विद्यार्थी विकासाचा विचार भिनलाय रक्तात ….!! 

अशा या रक्तरक्तात विद्यार्थी हिताचे रक्त खेळवणार्या ताईचा सहवास ,मार्गदर्शन आणि कधी कधी कौतुकाची थाप मला मिळते ही मी माझ्यासाठी भाग्याची गोष्टच समजतो ,अशा या आपल्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या तिच्याच शब्दात ‘जाम भारी’ शुभेच्छा ……!! 

ताई आज तुझ्या वाढदिवसानिमित्त ,तुला ATM परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा …..!! 

येणारे वर्ष आपणांस सुखाचे ,समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ …..!! 

आपल्या सर्व ईच्छा, आशा ,आकांक्षा पूर्ण होवोत ….!! 

विद्यार्थी ,समाज आणि शिक्षक हिताची अशीच अनेकानेक कामे आपल्या हातून घडोत …..!! 

ताई तुम्हला उत्तम आरोग्य लाभो….!! 

आधुनिक सावित्रीच्या आवेशाने माता सरस्वतीचा वारसा तर आहेच,माता लक्ष्मी ही आपल्यावर सदैव कृपादृष्टी ठेवो हीच राजमाता जिजाऊ चरणी प्रार्थना….!! 

पुनश्च एकदा…. 

वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा …..!!! 
शब्दांकन – नारायण मंगलारम