ATM चा वर्धापन दिन व प्रकाशन संस्थेच्या नावाचे विमोचन कार्यक्रम

Event Timeline

Date: March 24, 2019
Time: 11:00 to 16:00
Timezone: GMT+5:30
Place: RCM गुजराथी हायस्कूल , फडके हौद , पुणे

ATM चा वर्धापन दिन व प्रकाशन संस्थेच्या नावाचे विमोचन कार्यक्रम…

आपणा सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होतो आहे की दिनांक २४ मार्च हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा ,उत्साहाचा ,समृद्ध करण्याचा दिवस… कारण याच दिवशी महाराष्ट्राच्या शिक्षण पंढरीत ,विद्येच्या माहेरघरात अर्थात ‘पुण्यात’ राज्याच्या कानाकोपऱ्यातील काही निवडक शिक्षकांना सोबत घेऊन आपण ‘कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM )’ या परिवाराचे बीजारोपण केले ,ज्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि जो राज्यातील ‘विद्यार्थी ,समाज आणि शिक्षक हिताय’ काम करणाऱ्या हजारो उपक्रमशील शिक्षकांना छाया देण्याचे काम करतो आहे .
येत्या रविवार दिनांक 24 मार्च 2019 ला ATM परिवाराचा पाचवा वर्धापन दिन – अर्थात
‘आणखी एक पर्वणी ….’
‘पुन्हा एकदा सोबतीने समृद्ध होण्याची’
‘जीवलगांच्या स्नेहभेटीची’
आणि वेळ आली ATM च्या स्वतःच्या प्रकाशन संस्थेचे नाव जाहीर होण्याची..
येत्या रविवार 24 मार्च 2019 ला आपण ATM चा ‘वर्धापन दिन’ पुणे येथे एकत्र एकत्र येऊन साजरा करणार आहोत,ज्यांना ज्यांना येणे शक्य आहे त्यांनी अवश्य येण्याचा प्रयत्न करावा आणि व्यवस्थापनासाठी आधी कल्पना द्यावी …..!!
(भोजन व्यवस्था करणे सोपे जाईल)
आपल्या उपस्थितीबद्दल समूहावर किंवा वैयक्तिक मला कळवले तरी चालेल.

टीप :

वेळ – सकाळी 11: ते 4 ठिकाण – पुणे

विक्रम अडसूळ
राज्य संयोजक
ATM