शिक्षण संमेलन

Event Timeline

Date: May 24, 2019
Time: 08:00 to 16:30
Place: Nashik

सर्वांना नमस्कार,
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ATM समूहाचे चौथे शिक्षण संमेलन YCMOU नाशिक येथे घेण्याचे ठरविले आहे. YCMOU नाशिक हे ठिकाण मिळणे ही ATM परिवारासाठी अभिमानाची बाब आहे.
गेल्या महिनाभरापासून संमेलन स्थळ निवडण्यापासून ते राहणे व भोजनाची व्यवस्था करणे यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. याकामी ATM नाशिक टीम चे सहकार्य व प्रयत्न वाखाणण्याजोगे राहिले. सदर संमेलनात आपली राहण्याची व्यवस्था देखील YCMOU मध्ये करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या उदघाटनाला व समारोपाला कुलगुरु,मा .प्राची साठे मॅडम व मॅक्सिन बर्नसन (मॅक्सिन मावशी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दिनांक 24 व 25 मे 2019 रोजी होणारे दोन दिवशीय संमेलन कसे असेल याची रूपरेषा कार्यक्रम पत्रिकेत दिली आहे.

*सोबत कार्यक्रमपत्रिका:-*