कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात Active teachers maharshtra ( ATM ) हा राज्यातील सकारात्मक ऊर्जा घेऊन काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा गट आहे, ‘विद्यार्थी समाज व शिक्षक हिताय’ हे ब्रीद घेऊन लिहिता लिहता लिहिते होऊयात या तत्वाला अनुसरून नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्याच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन ,उत्तेजन देणारा तसेच प्रेरणा द्या ,प्रेरणा घ्या म्हणत ,सोबतीने समृद्ध करणारा ,गेल्या चार वर्षात आपल्या वैशिष्ट्य पूर्ण कामाने राज्याच्या शिक्षण क्षेत्राला एक सुयोग्य दिशा देण्याचे काम करणारा परिवार म्हणजे ATM परिवार , हे करत असताना विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताच्या धोरणाबाबत सरकारच्या हातात हात घालून आणि जिथे विद्यार्थी आणि शिक्षक हिताला बाधा येत असेल तिथे उघड विरोध ही परिवाराची स्पष्ट भूमिका आहे . वाडी ,वस्ती ,तांडा येथे काम करणारा प्रत्येक प्राथमिक शिक्षक आणि त्याचे काम उत्कृष्टच आहे ,शासन प्रशासनात सामान्य शिक्षक ते उच्च पदस्थ अधिकारी असले तरी we are one ही टॅग लाईन घेऊन आपण सर्व एक आहोत असे सांगत महाराष्ट्राचे शैक्षणिक चित्र सकारात्मक दृष्ट्या बदलण्याचे उद्दिष्ट घेऊन काम करणारा गट म्हणजे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र परिवार.
या परिवाराच्या माध्यमातून आपण आज पर्यंत तीन राज्यस्तरीय शिक्षक संमेलने राज्यातीलच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थिती पार पडली आहेत ,परिवाराचा वाढता विस्तार आणि वाढत जाणारी कामाची व्याप्ती लक्षात घेता ऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे ,फुलगाव पुणे येथे आयोजित केलेले तिसरे राज्यस्तरीय शिक्षक संमेलन ऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीनेच आयोजित करण्यात आले होते.
गत वर्षी आपण लिहिता लिहिता लिहिते होऊयात या तत्वाला अनुसरून जिल्हा निहाय नाशिक, सोलापूर ,ठाणे ,परभणी ,अहमदनगर ,औरंगाबाद ,नांदेड ,पुणे या गटांचे ई शैक्षणिक अंक प्रकाशित केले होते ,याला अनुसरूनच फेब्रुवारी २०१९ मध्ये परिवाराने सदस्यांच्या लिखित अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ,त्यातील साहित्यिक मूल्याची जोपासना करण्यासाठी ‘पाहिले राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे .विद्यार्थी, समज व शिक्षक हिताच्या अनेक योजनांची अंमलबजावणी करणे हे येणाऱ्या काळातील उद्दिष्ट असणार आहे ,त्यासाठी परिवारातील सदस्यांनीच सेच्छा निधी उभारला आहे ,ज्यातून भविष्यात लेखन कार्यशाळा आयोजन ,स्वतःचे प्रकाशन ,जिथे आवश्यक असेल तेथे मदत या व इतर अनेक योजना हाती घेण्याचे योजले आहे .