तंत्रस्नेही माध्यमिक शिक्षक कार्यशाळा नाशिक

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मा.नंदकुमारसाहेबांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्रातील कृतिशील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने सुरु असणारी तंत्रस्नेही शिक्षणाच्या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी आणि शिक्षण विभागातील गुणवत्तेला आणखी गती प्राप्त करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांसोबतच माध्यमिक शिक्षकांना www.technotechers.in या वेबच्या माध्यमातून नोंदणी करून तंत्रस्नेही प्रात्यक्षिकाच्या कार्यशाळेव्दारे प्रशिक्षित करण्यात येत आहे .
विद्या प्राधिकरण महाराष्ट्र. अंतर्गत
RMSA नासिक आणि प्रादेशिक विद्याप्राधीकरण नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यासाठी नॅशनल ऊर्दू स्कूल नाशिक या ठिकाणी असणारी अतिशय सुसज्ज, इंटरनेट कनेक्टिव्हीटी सह उपलब्ध असणारी computer lab निवडण्यात आली .*कार्यशाळा पहिला दिवस*दिनांक २२ /३/२०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता नॅशनल ऊर्दू स्कूल चे प्राचार्य …. तसेच उपशिक्षणाधिकारी (माध्य) मा.जगताप साहेब,प्रादेशिक विद्या प्राधिकरण चे जेष्ठ अधिव्याख्याता मा.खारके साहेब राज्यस्तरीय माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक नाशिक समन्वयक श्री आहिरे सर शेखर सर,मुंगसे सर, नवसरे सर तसेच नॅशनल ऊर्दू स्कूल च्या Computer Lab चा सपोर्टेट स्टाफ आणि प्रशिक्षणार्धी यांच्या उपस्थितीत तंत्रस्नेही पद्धतीने उद्घाटन करण्यात आले .
उपशिक्षणाधिकारी मा.जगताप साहेबांनी माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षकांच्या चळवळीबद्दल अपेक्षा व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.

👉🏻 मी व आहिरे सरांनी ice breaking च्या माध्यमातून एकमेकांचा परिचय करुन घेतला .

👉🏻माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक नाशिकचे जिल्हा समन्वयक व सुलभक आहिरे सरांनी तंत्रस्नेही कार्यशाळेची रूपरेषा प्रशिक्षणार्थींसमोर मांडून प्राथमिक प्रशासकीय कामकाज पूर्ण केले व तंत्रज्ञानाची शिक्षणात गरज ,उद्देश व महत्त्व चर्चेच्या माध्यमातून अतिशय सोप्या आणि सहज भाषेत सर्वांसमोर मांडले आणि एकमेकांची मते जाणून घेतली .

👉🏻तंत्रज्नानातील shortforms चा वापर करून सुलभकांनी ice breaking घेतली.

👉🏻 *दरम्यान प्रादेशिक विद्या प्राधिकरण चे प्राचार्य ,नाशिक जिल्ह्यातील चालते फिरते ज्ञानपीठ मा.सुर्यवंशी साहेब यांनी कार्यशाळेस भेट देऊन तंत्रस्नेही शिक्षकांना संबोधित केले.*

👉🏻गुरूकुल टीमचे सर्वेसर्वा आणि राज्यतंत्रस्नेही टीमचे सदस्य श्री शेखर सरांनी Ms word
 आणि

👉🏻श्री दादाजी आहिरे सर यांनी Ms excel चे बारकावे प्रात्यक्षिकासह शिक्षकांकडून करून घेतले .

👉🏻श्री सचिन मुंगसे सर यांनी power point presentation चा परिचय करुन दिला.

👉🏻technology in future याबद्दल व्हिडिओ दाखवून सर्वांची मते घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली .*कार्यशाळा दुसरा दिवस*

👉🏻कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे प्रेझेंटेशन पी पीटी च्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींनी केले.

👉🏻आहिरे सरांनी गुगल सर्च,Google input tools आणि त्यातील बारकावे याबद्दल सखोल दिशादर्शन केले.

👉🏻 ज्ञानदेव नवसरे यांनी online test बद्दल माहिती देऊन सर्वांकडून online test बनवून घेतल्या.

👉🏻 Google map,Google earth,Google translator चा शैक्षणिक वापराबद्दल शेखर सरांनी प्रात्यक्षिकासह सखोल दिशादर्शन केले.

👉🏻 ज्ञानदेव नवसरे यांनी Google drive चा शैक्षणिक वापरासंबंधी प्रात्यक्षिकसह सखोल दिशादर्शन केले.

👉🏻 Google form चा माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढण्यासाठी तसेच शैक्षणिक वापर कसा करावा याबद्दल प्रत्येकाचा Google form तयार करून दिशा दाखवण्यात ज्ञानदेव नवसरे यांनी मदत केली.

👉🏻शेखर सर तसेच नवसरे सर यांनी camtasia साॅफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ निर्मिती कशी करावी याबद्दल व्हिडिओ तयार करून software ची ओळख करून दिली .दरम्यान सुलभक टीमने सर्वांच्या पेनड्राईव्ह मध्ये software दिले.

👉🏻 ज्ञानदेव नवसरे यांनी QR code चा शैक्षणिक वापर याबद्दल माहिती सांगून प्रत्येकाकडून QR कोड तयार करून घेतले.

👉🏻you tube चा searching, uploading, downloading चा प्रत्यक्ष कसा वापर करावा याबद्दल सचिन मुंगसे सरांनी प्रात्यक्षिक करून घेतले ,प्रत्येकाने स्वतः चे शैक्षणिक चॅनल तयार करुन videos you tube ला अपलोड केले .
You tube चा शैक्षणिक वापर कसा करावा याबद्दल मुंगसे सरांनी छान दिशादर्शन केले.*कार्यशाळा तिसरा दिवस*प्रशिक्षणार्थी पानपाटील सरांनी Camtasia च्या मदतीन बनवलला दोन दिवसांच्या कार्यशाळेचा वृत्तांत सांगणारा व्हिडिओ दाखवण्यात आला .
दरम्यान निकाळजे सरांवर शैक्षणिक व्हिडिओ,कैलास गवळे सरांचा opening video ,तसेच इतर प्रशिक्षणार्थी यांचे प्रेझेंटेशन घेऊन व व्हिडिओ दाखवून सर्वांना व्हिडिओ निर्मिती साठी शुभेच्छा देण्यात आल्या

👉🏻skype ,hangouts, what’s app videos call. यांचा शैक्षणिक वापर कसा करावा याबद्दल आहिरे सर,शेखर सर, नवसरे सर यांनी दिशादर्शन केले.

👉🏻zoom app चा वापर करून व्हिडिओ conference शेखर ठाकूर सरांनी घेतली.

👉🏻श्री आहिरे सरांनी अध्यापनात ICT चा वापर कसा करावा, तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापनातील महत्त्व याबद्दल दिशादर्शन करून प्रशिक्षणार्थींची वैयक्तिक मते जाणून घेतली.

👉🏻मोबाईल एक शैक्षणिक साधन याबद्दल मुंगसे सरांनी दिशादर्शन केले.

👉🏻शेखर ठाकूर सर,आहिरे सर यांनी विविध educational apps चा वापर कसा करावा याबद्दल काही उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितले .
*दरम्यान मा.सुर्यवंशी साहेब, तसेच मा.खारके साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभले*

👉🏻 नवसरे सरांनी शैक्षणिक blog कसा तयार करावा याबद्दल प्रात्यक्षिक सह दिशादर्शन करून सर्वांचे blog तयार करून घेतले.

👉🏻 शैक्षणिक websites कशा तयार कराव्यात ,त्यांचा वापर कसा करावा याबद्दल शेखर सरांनी दिशादर्शन केले.

👉🏻 *उपसंचालक मा.जाधव साहेब यांनी कार्यशाळेला उपस्थित राहून शिक्षकांना संबोधित करून अमूल्य दिशादर्शन केले*

👉🏻सरतेशेवटी प्रशिक्षणार्थींनी
मा.उपसंचालक श्री जाधव साहेबांचा , सर्व सुलभकांचा, भव्य आणि सुविधांसह सुसज्ज असणाऱ्या Computer Lab ची उपलब्धता करून देण्या-या नॅशलन उर्दू स्कुल नाशिकच्या मा प्राचार्य साहेबांचा व प्राचार्य मॅडम चा आणि compter lab सपोर्ट टीमचा ,मा खारके साहेबांचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करून कार्यशाळेतील कामकाजाबद्दल सन्मान व्यक्त केला.