जिज्ञासू तंत्रस्नेही शिक्षकांचा मेळा

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची वाटचाल ,प्रत्येक शिक्षक,अधिकारी वर्गांची धडपड आणि उत्साह कमालीचा आहे याचा प्रत्यय आपण आपल्या बीटात, तालुक्यातून घेत आहोच तसेच शाळा भेटी,विविध कार्यशाळा ,शिक्षण परिषदा ,वारी यांच्या माध्यमातून इतर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालही आपल्या लक्षात येत आहे .

ATM नाशिकचे सदस्य ,चांदवड तालुक्यातील कृतिशील शिक्षक,आपले मित्र प्रदिपदा देवरे सर तसेच चांदवड तालुक्याचे दिशादर्शक गटशिक्षणाधिकारी मा.श्री बी टी चव्हाण साहेब तसेच विस्ताराधिकारी शिक्षण मा.श्री एन पी आहेर साहेब, केंद्रप्रमुख मा.श्री वाघचौरे सर,श्री.शिंदे सर सर्वांच्या निमंत्रणास स्वीकार करून चांदवड तालुक्यातील काजीसांगवी बीटाच्या शिक्षण परिषदेला उपस्थित राहता आले ,निमित्त होते Blog Devolopment दिशादर्शन 💻

प्रदिप देवरे सरांच्या घरी पाहुणचार घेऊन आम्ही  जि प शाळा पिंपळद काजीसांगवी बीटाच्या शिक्षण परिषदेच्या   ठिकाणी गेलो.

उत्साहानं नटलेल्या वातावरणात आमचे स्वागत करण्यात आले ,
क्षणाचाही विलंब न करता मा.आहेर साहेबांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती दिली.

Educational blog बद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली .
काजीसांगवी
बीटातील ९५% बांधवांनी blog निर्मिती केल्याचे ऎकून खुप समाधान वाटले. इतक्या मोठ्या प्रमाणावर blog बनवणारे हे राज्यातील पहिलेच बीट असेल. उर्वरित बांधवांसाठी  प्रत्यक्ष blog निर्मिती आणि सर्वांसाठी आवश्यक असणारे Blog Designing या बद्दल दिशादर्शन करण्यात आले .
काजीसांगवी बीटातील शिक्षण परिषदेला उपस्थित असणाऱ्या निम्यापेक्षा जास्त बांधवांनी स्वतः चा laptop घेऊन उपस्थिती लावली होती, यावरून शिक्षकांची जिज्ञासा, बीटातील तंत्रस्नेही वाटचाल आपल्या लक्षात येत असेलच.

चांदवडचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री चव्हाण साहेब हे काही वर्षे पेठ तालुक्यात नोकरी ला होते, हे ऎकून माझ्या मनात आणखी अापुलकीची भावना निर्माण झाली.
 नवसरे सर आपल्या तालुक्यात आले आहेत,खास त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे मा.चव्हाण साहेबांच्या या  वाक्याने जे समाधान आणि आनंद झाला ते शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे , तंत्रस्नेही चळवळी च्या वाटचालीतील कामाची ह्यापेक्षा मोठी पावती कुठंय.
मा.श्री चव्हाण साहेबांच्या दिशादर्शनाखाली चांदवड तालुक्यातील शैक्षणिक वाटचाल जोमाने पुढं जात आहे हे त्यांच्या अल्पशा दिशादर्शनातून लक्षात आले.
आपले मित्र प्रदिपदा देवरे सर यांच्या तंत्रसाधना या शैक्षणिक ब्लाॅगचे मा.गटशिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले ,त्याबद्दल प्रदिपदा देवरे सरांचे अभिनंदन 💐💐
चांदवड तालुक्यातील तंत्रस्नेही वाटचालीसाठी प्रदिपदा देवरे सरांची तळमळ कमालीची आहे 😊
काजीसांगवी बीटातील मान्यवर आणि शिक्षकांची रजा घेत आम्ही परतीच्या दिशेने निघालो.